Pasodi by Nitin Rindhe पासोडी नीतीन रिंढे
Pasodi by Nitin Rindhe पासोडी नीतीन रिंढे
Couldn't load pickup availability
नीतीन रींढे हे साहित्याचे आणि संस्कृतीचे व्यासंगी समीक्षक आहेत. ग्रंथ, ग्रंथकार, ग्रंथव्यवहार,ग्रंथेतिहास हे त्यांच्या निरंतर आस्थेचे विषय आहेत. प्रस्तुत संग्रहात ते ग्रंथाबद्दल, मराठी आणि परदेशी ग्रंथाबद्दल, वाड्मय संस्कतीबद्दल आणि वाचन संस्कृतीबद्दल लिहितात. कारण हे त्यांच साक्षेपी अक्षत्य आहे.
मराठी मनातलं 'पासोडी' या शब्दाच्या अर्थाचं साहचर्य वैचित्र्य आणि विविधतापूर्ण, विलक्षण अशा चार शतकांपूर्वीच्या प्रसिद्ध साहित्यकृतीशी निगडित आहे. प्रतिपाद्य विषयाबद्दलची अपार आस्था प्रचलित चौकटीत मांडता येऊ न शकण्यातून निर्माण झालेली पटविस्ताराची आस यातून दिसते. दीड दशकात लिहिलं गेलेलं वैविध्य असलेलं तरीही एका व्यापक सूत्रात बांधलं जाऊ शकणारं हे लेखन आहे. आस्थेच्या अंतर्कक्षेतलं जे जे काही आहे ते प्रस्तुत पुस्तकात साहित्य या एका सूत्रात आणलेलं आहे म्हणूनही या पुस्तकाचं शीर्षक 'पासोडी' असं आहे. -गणेश विसपुते
Share
