Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Ran Durg रण दुर्ग by Milind Bokil
Rs. 270.00Rs. 300.00

Ran Durg रण दुर्ग by Milind Bokil

तिच्या मनात कसली तरी अदभूत जाणीव भरून आली. तिला समजत राहिले की आपण एका वेगळयाच जगात आहोत आणि एक वेगळाच अनुभव आपल्याभोवती साकारतो आहे. डोक्यावर चांदण्यांनी लगडलेलं हे भव्य दैवी आकाश आहे आणि दुस-या बाजूला काळोखात झोपलेली पॄथ्वी. आपण ह्या दोहोंपैकी कशातच नाही. पॄथ्वीवरचे ते सगळे जग आपल्यापासून फार दूर आहे. ती सगळी माणसे. काही परकी. काही आपली. त्यांचे कसलेच पाश आपल्याभोवती नाहीत. आपण कुणाची बहीण नाही, भाची नाही, मुलगी नाही, या वरच्या चांदण्याही आपल्या नाहीत. त्यांना पकडायचे बंधन आपल्यावर नाही. इथे मध्यभागी आपण फक्त आपण आहोत. ही जी थंड हवा लागते शरीराला, हा दगडाचा कठीण स्पर्श होतो, चांदण्यांचा प्रकाश, भोवतालचे सगळे आसमंत... या सगळयातून आहोत ते फक्त आपण. आपल्याला अगम्य असे काही नाही. अप्राप्य असे काही नाही. अशक्यही काही नाही.

Categories:
Translation missing: en.general.search.loading