Relations : Nata Jodtana (Marathi) by Dr. Smita Prakash Joshi रिलेशन्स: नातं जोडताना
Relations : Nata Jodtana (Marathi) by Dr. Smita Prakash Joshi रिलेशन्स: नातं जोडताना
Couldn't load pickup availability
स्वतःसाठी सिरियस रिलेशनशीपच्या शोधात असलेली नवीन पिढी 'वी वेअर मेड फॉर इच आदर' असं म्हणतं नातं जोडते; पण काही दिवसांतच 'वी कॅन नॉट हँडल द कॉन्ट्राडिक्शन्स' असं म्हणून नातं तोडायला तयार होते, अशा 'झी जनरेशन!'साठी मार्गदर्शक... रिलेशन्स : नातं जोडताना!
'रिलेशन्स' जोडताना नक्की चुकतं कसं आणि कुणाचं? नातं जोडण्याची आणि टिकवण्याची कला कशी आत्मसात करावी, याबाबतचं सर्वंकष समुपदेशन करणारं....
नातं कोणताही असो, ते जोडताना येणाऱ्या अडचणी कोणत्या आणि त्या दूर करण्यासाठी कोणते उपाय आहेत हे सुचवणारं.... नातं जोडण्यापूर्वी आणि पालकत्व निभावण्यापूर्वी प्रत्येकाने वाचलेच पाहिजे, असे दिशादर्शक!
लेखिकेविषयी माहिती : लेखिका डॉ. स्मिता प्रकाश जोशी यांनी 'एमएसडब्ल्यू', 'एलएलएम' आणि 'लॉ'मध्ये पीएचडी केली आहे. जानेवारी, १९९७पासून पुणे येथे समुपदेशक म्हणून त्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र ज्युडिशियल अॅकॅडमी महिला व बालकल्याण विभाग प्रशिक्षण केंद्र, 'यशदा' यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये समुपदेशन विषयक प्रशिक्षण व व्याख्याने त्या देत आहेत. वंचित विकासतर्फे 'कृतज्ञता राज्यस्तरीय पुरस्कार', 'नवदुर्गा पुरस्कार', 'कै. प्रेमाताई कामतेकर स्मृती पुरस्कार' त्यांना प्राप्त झाले आहेत. डॉ. जोशी यांची 'अर्थ नात्यांचा' (कौटुंबिक समुपदेशन), 'लग्नाचा जीपीएस' (विवाहपूर्व समुपदेशन) आणि 'कौटुंबिक वादासाठी विशेष न्यायव्यवस्था', कौटुंबिक न्यायालय ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
Share
