Savarkar Samajhun Ghetana सावरकर समझून घेताना
Savarkar Samajhun Ghetana सावरकर समझून घेताना
सावरकर समजून घेताना
लेखक - हेमंत सांबरे
पुस्तकाबद्दल थोडेसे
लेखक हेमंत सांबरे यांच्या गेल्या २० वर्षांच्या सावरकर जीवनावरील अभ्यासाचे सार म्हणजे "सावरकर समजून घेताना" हे पुस्तक आहे .
या पुस्तकात सावरकरांनाच ' स्वातंत्र्यवीर ' का म्हणावे , हे अगदी मुद्देसूद पणे सांगितले आहे . तसेच सावरकरांच्या कवितेची वैशिष्ट्ये सांगणारा एक स्वतंत्र लेख समाविष्ट करण्यात आला आहे . पुढे सावरकरांच्या आयुष्यातील कुठले गुण आपण घेऊ शकतो हे सांगणारे ' अविरत सावरकर ' व ' सावरकर कधीही बदलले नव्हते ' हे दोन्ही लेख अनेक अर्थाने वेगळे आहेत .
सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे सावरकरांचे हिंदुत्व व त्यांना हवे असलेले हिंदुराष्ट्र हा विषय ही विस्ताराने मांडला आहे .
इतर अनेक लेख समाविष्ट करत असताना ' भारताला स्वातंत्र्य कसे व का मिळाले ?' हा एक अनेक पुरावे देऊन लिहलेला लेख या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे .
सावरकर का नको ? या लेखातून सावरकरांना सतत का नाकारले जाते हे मांडले आहे