Skip to product information
1 of 1

Shapath | शपथ by AUTHOR :- Narayan Dharap

Shapath | शपथ by AUTHOR :- Narayan Dharap

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

त्या संध्याकाळी जयराम बाहेर गेला – नेहमीसारखाच.
पण नेहमीसारखा तासा-दोन तासात परत आला नाही.
रुक्मिणीला काळजीने वेड लागायची वेळ आली होती. तोच खोलीचं दार दाणदिशी उघडून जयराम आत लटपटत्या पावलांवर आला आणि जमिनीवर कोसळलाच. त्याचे कपडे फाटले होते, चिखल-मातीने लडबडले होते. श्वास धापांनी येत होता. रुक्मिणी घाईघाईने जवळ आली तेव्हा तिला दिसलं की, त्याच्या गालावर, मानेवर दोन्ही हातांवर (मागून दिसलं की पाठीवरही) ओरबाडल्याच्या, रक्ताळलेल्या जखमा होत्या. एखाद्या चित्त्याने किंवा बिबट्याने पंजाने ओरबाडल्यासारख्या जखमा.
‘‘अहो- अहो- झालं तरी काय-?’’ रुक्मिणी ओरडलीच.
जयराम डावा हात हलवत होता- नाही नाहीची खूण करीत होता. त्याचा उजवा हात पुढे होता- हातात एक कागद होता- ‘‘वाच!’’ तो घोगर्याक आवाजात म्हणाला.
जयराम आणि रुख्मिणी यांच्या रोजच्या आयुष्यातील ही विचित्र घटना. ती का घडली असावी? अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागेल असा संशय जयरामला आधीच का आला असावा? ‘आपली शपथ आठवा, मायगावला परत या’ अशी पत्रे त्याने कुणासाठी व का लिहून ठेवली होती?
या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी प्रस्तुत कादंबरी जरूर वाचा.

View full details