Shodh Bhavani Talvaricha by Indrajeet Sawant शोध भवानी तलवारीचा
Shodh Bhavani Talvaricha by Indrajeet Sawant शोध भवानी तलवारीचा
Couldn't load pickup availability
Shodh Bhavani Talvaricha Book शोध भवानी तलवारीचा Indrajeet Sawant Books Chhatrapati Shivaji Maharaj Marathi छत्रपती शिवाजी महाराज Talwar तलवार इंद्रजित सावंत इंद्रजीत Indrajit मराठी पुस्तक पुस्तके बुक
छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार कशी होती? भवानीदेवीने शिवरायांना तलवार दिली काय? समकालीन चित्रे व पाषाण शिल्पांमध्ये शिवरायांची तलवार कशी आहे? ऐतिहासिक संदर्भ-साधने शिवरायांच्या तलवारींविषयी काय माहिती सांगतात? अखंड हिंदुस्थानास प्रेरणादायी असलेली शिवरायांची तलवार आज कुठे आहे? अफजलखान वधावेळी शिवरायांनी 'वाघनख' वापरली काय? आज ही 'वाघनख' कुठे आहेत ?
या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांचा वेध घेत आहेत, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आपल्या 'शोध भवानी तलवारीचा' या अनेक दुर्मीळ छायाचित्रे आणि ऐतिहासिक संदर्भाने परिपूर्ण असलेल्या पुस्तकामध्ये.
शिवछत्रपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. आपल्या लहानपणापासून आपल्या कानावर शिवाजी महाराजांची भवानी तलवार, अफजलखानाला ठार करणारी त्यांची वाघनखे, त्यांची चपळ कृष्णा घोडी अशा अनेक गोष्टी आलेल्या असतात. अशा गोष्टींबद्दल मराठी माणसांच्या मनात कमालीचे औत्सुक्य असते.
शिवाजी महाराजांच्या तलवारींचे विशेषतः भवानी तलवारीचे, ऐतिहासिक साधनांत जेथे जेथे म्हणून उल्लेख आलेले आहेत त्यांचे संदर्भप्रस्तुत पुस्तकात आले आहेत. या पुस्तकात छत्रपती शिवरायांच्या शस्त्रांचा संशोधक वृत्तीने घेतलेला मागोवा स्तुत्य आहे. या पुस्तकाचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे सध्या महाराजांची भवानी तलवार कोठे आहे, या प्रश्नाचा लेखकाने केलेला पाठपुरावा.
प्रस्तुत पुस्तकातील चर्चेवरून लंडनमधील जगदंबा तलवारीचे पारडे सर्वांत जड आहे, असे अभ्यासांती आमचे मत बनले आहे. अशी ही शिवरायांची जगदंबा तलवार आज ना उद्या मायदेशी महाराष्ट्रात परतेल अशी आपण अपेक्षा करूया.
- डॉ. जयसिंगराव पवार
कोल्हापूर
Share
