Skip to product information
1 of 1

Shri Shivgeeta By Suyog Chhatre श्री शिवगीता सुयोग छत्रे

Shri Shivgeeta By Suyog Chhatre श्री शिवगीता सुयोग छत्रे

Regular price Rs. 600.00
Regular price Rs. 650.00 Sale price Rs. 600.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

"श्रीशिवगीता - छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवद-गीतेतून घेतलेला शोध" या ग्रंथाबद्दल

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! त्यांचे आयुष्य म्हणजेच साक्षात भगवद गीता आहे. दैवतीकरण न करता प्रयत्नवाद आणि निष्काम कर्मयोग यावर आधारित हा ग्रंथ आहे. 

या ग्रंथात भगवान श्रीकृष्णाने उद्धृत केलेली व महर्षी व्यासांनी 18 अध्यायात शब्दबद्ध केलेली गीता आणि शिवचरित्रातील अनेक प्रसंग यांचे साधर्म्य दाखवून दिलेले आहे. भगवद-गीतेत कथित केलेले श्लोक, श्लोकांचे मराठी अर्थ यांद्वारे शिवचरित्राचा एक मनोवेधक मागोवा घेतलेला आहे.  

ग्रंथाचे अंतरंग
- भगवद-गीतेत 18 अध्याय आहेत त्याचप्रमाणे शिवचरित्रात म्हणजेच "श्रीशिवगीता" या ग्रंथात सुद्धा 18 अध्याय आहेत. हा ग्रंथ एक अभ्यास ग्रंथ आहे. शिवचरित्रातील सावधपणा, कुटुंब वत्सलता, सेना नेतृत्वता, ज्ञानप्रसार, समाज सुधारणेचा ध्यास, एक न्यायशील राज्य स्थापण्याचे ध्येय इत्यादी विषय गीतेतील श्लोकांच्या आधारे स्पष्ट केले आहेत.  

- भगवद-गीतेतील प्रत्येक अध्याय आणि शिवचरित्रातील प्रसंग यांचे गुंफण या ग्रंथाद्वारे आपण पाहणार आहोत.एका अर्थाने भगवद-गीता आणि शिवचरित्रातील साम्य या ग्रंथाद्वारे आपल्याला वाचायला मिळेल. 

- भगवद-गीतेतील कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे शिवचरित्रातील उदाहरणांसह या ग्रंथात दाखवून दिलेले आहेत.

- युद्धांपलीकडले शिवचरित्र आणि अनेक अपरिचित पैलू आपल्याला या ग्रंथात वाचायला मिळतील.  

- शिवचरित्रातील अनेक प्रसंगांची दुर्मिळ छायाचित्रे तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेले सादरीकरण या ग्रंथात पाहायला मिळेल.

253 पानांची आकर्षक कलर एडिशन आणि हार्ड बॉउंड प्रत 

आकर्षक आणि अपरिचित ऐतिहासिक चित्रे आणि उत्कृष्ठ दर्जा

View full details