Shyama by Chandrakant Kakodkar श्यामा
Shyama by Chandrakant Kakodkar श्यामा
Couldn't load pickup availability
एका तरुण कवीच्या आयुष्यातील कालटप्प्यांत तीन स्त्रियांशी आलेल्या संबंधांच्या गोष्टी म्हणजे चंद्रकांत काकोडकर यांची ‘श्यामा’ कादंबरी…
ट्रामवर अवलंबून असलेल्या मुंबईच्या पार्श्वभूमीत घडणाऱ्या या कादंबरीत काकोडकरांच्या लेखनाची सारी वैशिष्ट्ये सापडतील. आज तिला थोर म्हणा किंवा वाईट, पण ती वाचताना नायकाचे कवीपण, त्याच्या कविता आणि एकूण जगण्याचे तपशील सापडतील. शिवाय त्यावर अश्लीलतेचा आरोप किती हास्यास्पद होता हे कळेल. पंचवीस रुपये दंड न भरता आरोपांविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढता लढता पदरचे दहा हजार रुपये (त्या काळातले) खर्च करणारा आणि प्रचंड मनस्तापाचा धनी झालेला मराठीतील हा एकमेव लेखक ! १९७१ नंतर या कादंबरीची प्रत दुर्मीळच राहिली. पुढील आवृत्ती काढायला कुणी धजावले नाही. श्रृंगारिक लेखक म्हणून काकोडकरांना बाजूला ठेवणाऱ्या साहित्याच्या मुख्य धारेला या कादंबरीच्या ऐतिहासिक मूल्याची जाण कधी झाली नाही. ही कादंबरी सर्वोच्च न्यायालयात निर्दोष सिद्ध झाल्याने राज्यातील न्यायालयांत त्यावेळी गुदरण्यात आलेले अशा प्रकारचे कथा-कादंबऱ्यांवरील सारे खटले निकाली लागले. त्यामुळेदेखील ‘श्यामा’चे महत्त्व अधोरेखित होते…
पंकज भोसले (प्रस्तावनेतून)
Share
