Source Code by Bill Gates सोर्स कोड माझे सुरुवातीचे दिवस - बिल गेट्स
Source Code by Bill Gates सोर्स कोड माझे सुरुवातीचे दिवस - बिल गेट्स
Couldn't load pickup availability
नव्या युगाची पहाट होत असतानाच्या काळात एका अस्वस्थ किशोरवयीन मुलात संगणकाच्या आज्ञावलीचे कोडिंग करण्याची आवड कशी निर्माण झाली, आणि ‘माझ्या बुद्धीच्या साहाय्याने मी जगातील कोणत्याही गुंतागुंतीच्या गूढाची उकल करू शकेन’ हा आत्मविश्वास त्यांच्या अंगी कसा निर्माण झाला ते दिसून येतं. त्यांच्या अभूतपूर्व व्यावसायिक कौशल्याची चिन्हे त्यांच्या बालपणातच आपल्याला आढळतात. वयाच्या विसाव्या वर्षी हॉर्वर्डमधील शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी आपली सर्व शक्ती लहानपणीच्या मित्रासोबत, पॉल अॅलनबरोबर स्थापन केलेल्या मायक्रोसॉफ्टसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या आयुष्यात ज्यांनी संगणक युगातील क्रांतीत महत्त्वाची भूमिका पार पाडली त्या स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वॉझनियाक आणि स्टीव्ह बामर या तीन स्टीव्हजबरोबर झालेल्या पहिल्या भेटींविषयी त्यांनी आत्मीयतेने लिहिलं आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये केवळ दहाबारा कर्मचारी असताना १९७०मध्ये त्यांनी जेव्हा अॅपलशी पहिला करार केला. त्या सुमारास या पुस्तकाचा, बिल गेट्स यांच्या सुरुवातीच्या काळाचा शेवट होतो. अशा प्रकारचे अनेक करार पुढे होत गेले आणि कोणी कल्पना केली नसेल एवढी मायक्रोसॉफ्टची वाढ होत गेली. पण तरीही ‘तू निर्माण केलेल्या संपत्तीचा तू फक्त काळजीवाहकच आहेस, हे कधीही विसरू नकोस,’ हे आपल्या आईचे शब्द बिल गेट्स कधीही विसरले नाहीत. बिल गेट्स यांची अखंड ऊर्जा, महत्त्वाकांक्षा आणि त्यांनी या जगात स्वतःला कसं घडवलं, हे समजून घेण्यासाठी त्यांच्या या प्रेरणादायक पुस्तकाची मदत होते.
Share
