Skip to product information
1 of 1

SWAPAPURTI स्वप्नपूर्ती - प्रेरणा नवउद्योजकांच्या by subhas Bhave

SWAPAPURTI स्वप्नपूर्ती - प्रेरणा नवउद्योजकांच्या by subhas Bhave

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
वाडवडलांकडून चालत आलेला कोणताही उद्योग अथवा व्यवसाय नसताना केवळ स्वत:च्या हिमतीवर, स्वकर्तृत्वाने ज्यांनी आपला उद्योग स्थापन केला, असे हे एकवीस प्रथम पिढीतील नवउद्योजक! त्यांच्या अंत:प्रेरणा काय होत्या, त्यांना बोलते करावे, त्यांना लिहिते करावे आणि ज्यांना उद्योगाचा प्रारंभ करायचा आहे, त्यांना प्रेरणा मिळावी या उद्दिष्टाने हे संकलन केले आहे. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता झाली, म्हणून ही स्वप्नपूर्ती!
काहींनी स्वत: लेखन केले, काहींच्या कहाणीचे शब्दांकन दुसऱ्याने केले. काही युवती व काही युवक त्यांच्या प्रेरणेत काही साम्य आहे. काही विविधता आहे. ज्या तरुण-तरुणींना स्वत:च्या कर्तबगारीवर काही करावयाचे मनात आहे; नोकरी न करता नोकऱ्या निर्माण करायच्या आहेत, त्यांना या छोटेखानी पुस्तकातून प्रेरणा मिळेल या विश्वासाने एकवीस वेगवेगळ्या उद्योगांच्या संदर्भातले तसेच व्यवसायांच्या संदर्भातले हे संकलन आपल्या हातात देत आहोत. ते उपयोगी राहील आणि संपादकांची ही स्वप्नपूर्ती होईल असे वाटते. ते आपल्या नव्या, उद्यमशील वाटेवर घेऊन जाईल आणि संपादकांचीही स्वप्नपूर्ती होईल, अशी आशा वाटते.
View full details