Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Time Management ani Safalta | टाईम मॅनेजमेंट आणि सफलता  by AUTHOR :- Ravindra Kolhe
Rs. 135.00Rs. 150.00
“आपल्याला जन्मजात मिळालेली वेळ हीच आपली खरी
संपत्ती असते. तीच लक्ष्मी असते, तेच ज्ञान असते, तेच
वैभव असते, तीच श्रीमंती असते, तेच सर्वस्व असते.
एकदा गेलेली वेळ परत कधीच येत नाही. म्हणून वेळेचा
सदुपयोग करायचा असतो. त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन
आवश्यक असते. येणारा प्रत्येक क्षण जगण्यासाठी आपण
त्या क्षणापूर्वी केलेली तयारी म्हणजे वेळेचे व्यवस्थापन.
आपल्याला वेळेचे नियोजन आणि व्यवस्थापन करायचे आहे,
ते जगण्याचा आनंद अधिक चांगल्या रीतीने उपभोगण्यासाठी.
आपल्या जगण्याला घड्याळाचे काटे टोचून आपल्या
आनंदाचा फुगा फुटून हवेत विरून जावा यासाठी नाही.
यामुळे गरजा आणि वेळ यांचा ताळमेळ घालणे म्हणजेच तर
खऱ्या अर्थाने वेळेचे व्यवस्थापन समजून घेणे होय.
त्यासाठी वेळेचे मूल्यमापनही करायला हवे. वेळेचे मूल्यमापन
म्हणजे वेळ मोजणे नसून वेळेची किंमत किंवा महत्त्व लक्षात
घेणे असते. प्रत्येक वेळेला आपले एक मूल्य असते, एक
किंमत असते. ही किंमत आपण जाणली तरच ती आपल्या
लक्षात येते.”
हे सर्वकाही योग्य वेळी आणि योग्य प्रकारे समजून
घेण्यासाठी, त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी ‘टाइम
मॅनेजमेंट’ वाचायलाच हवे.
Translation missing: en.general.search.loading