मराठी साहित्यजगतामध्ये श्री. नारायण धारप यांचे स्वतंत्र असे स्थान आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ श्री. धारप आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीत लिहिलेल्या भयकथा, विस्मयकथा, गूढकथा मराठी वाचकांना सादर करीत आहेत.
एका अदभुत, रहस्यमय आणि प्रसंगी अंगावर भीतीने काटा आणणार्या दुनियेमध्ये सफर घडविणारी त्यांची लेखणी अजूनही तितकीच ताजी, टवटवीत व वाचकाला रिझविणारी आहे. धारप म्हटल्यावर त्यांच्या कादंबरीमध्ये थरारक, भयप्रद, अंगावर काटा उभा करणारे, दचकविणारे आणि शेवटी सारं काही ठाकठीक झाल्याने वाचकालाही सुटकेचा नि:श्वास टाकायला लावणारे विचित्र, रोमांचकारक असे अनुभव असणार याची वाचक नकळतपणे आपल्या मनाशी अटकळ बांधतो.
धारपांची नवीन भयकादंबरी ‘वेडा विश्वनाथ’ हीही त्याला अपवाद नाही. संपूर्ण उपेक्षणीय, कोणतीही जाण नसलेला, समाजात कोणतेही स्थान नसलेला ‘वेडा विश्वनाथ’ आणि असामान्यांचा मेरुमणी ‘आर्यवर्मन’, आताचा क्षण आणि सहस्रकांपूर्वीचा क्षण असे विलक्षण विरोधी घटक निवडून धारप मन स्तिमित करणारी कथा विणतात. चित्रमय शैली, ओघवती भाषा, चातुर्यपूर्ण मांडणी हे विशेष ‘वेडा विश्वनाथ’ मध्येही आढळतील.
Veda Vishwanath | वेडा विश्वनाथ by AUTHOR :- Narayan Dharap
Veda Vishwanath | वेडा विश्वनाथ by AUTHOR :- Narayan Dharap
Regular price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 158.00
Unit price
/
per