Vidyarthyansathi Dnyaneshwari By Renu Dandekaar विद्यार्थ्यानसाठी ज्ञानेश्वर
Vidyarthyansathi Dnyaneshwari By Renu Dandekaar विद्यार्थ्यानसाठी ज्ञानेश्वर
Couldn't load pickup availability
व्यक्तिमत्त्व विकास ही संकल्पना प्रथम पाश्चात्यांनी पुढे आणली असा एक समज आहे. पण बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या भावार्थदीपिकेत म्हणजेच ज्ञानेश्वरीमध्ये व्यक्तिमत्त्वविकासाची बीजे दडली आहेत, हे सप्रमाण सिद्ध केले आहे रेणू दांडेकर यांनी 'विद्यार्थ्यांसाठी ज्ञानेश्वरी' या पुस्तकात. ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेचा केवळ अनुवाद नाही तर ज्ञानेश्वरांनी त्याही पुढे जाऊन जीवनाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांसाठी ज्ञानेश्वरीमध्ये मराठी भाषेत मांडले. यामध्ये त्यांनी अनेक दृष्टान्तांचा म्हणजेच उदाहरणांचा वापर केला. त्यांची सांगण्याची भाषा, संवादशैली आणि त्यांनी सांगितलेले दृष्टांत यामधून त्यांनी व्यक्तिमत्त्व कसे असावे, जीवन कसे जगावे, कोणत्या मूल्यांचा आधार घ्यावा, रोजचे जगणे अर्थपूर्ण कसे करावे आणि जीवनाचा मूलार्थ काय आहे हे स्पष्ट केले आहे. थोड्या थोड्या कारणांनी निराश होणाऱ्या, भविष्य अंधकारमय वाटणाऱ्या सध्याच्या पिढीला ज्ञानेश्वरीमधील सकारात्मकता, शांतिमार्ग आणि तत्त्वज्ञान अतिशय उपयुक्त आहे. म्हणूनच हे छोटेखानी पुस्तक विद्यार्थ्यांना स्वतःला घडवण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल.
Share
