Your cart is empty now.
Vilokan विलोकन by Vilas Khole विलास खोले
विलोकन हे मराठी साहित्यविश्वातील वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकृतीचे, लेखनप्रवाहांचे व लेखनप्रवृत्तींचे अवलोकन व आकलन आहे. तटस्थ दृष्टिकोनातून साहित्याचा वेध घेताना जिज्ञासू लेखकाच्या नजरेने न्याहाळलेले वाङ्मयीन रूप आणि रंग या पुस्तकात प्रत्ययपूर्ण शब्दांत मूर्त झाले आहेत. लोकसाहित्यातून कोशवाङ्मयापर्यंत, ‘अबलोन्नतिलेखमाला’ सारख्या वैचारिक / सामाजिक ग्रंथापासून ‘श्रीपु’सारख्या गौरवग्रंथापर्यंत, स्त्रीसाहित्यापासून ‘चित्रव्यूह, चलत्-चित्रव्यूह’ सारख्या संपन्न व्यक्तिलेखसंग्रहापर्यंत बहुविध वाङ्मयकृतींविषयींची निरीक्षणे विलोकन मध्ये वाचावयास मिळतात. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त लोकवाङ्मय गृहाने मुद्दाम प्रकाशित केलेल्या संपादित साहित्यमालेचे केलेले स्वागतही या पुस्तकाच्या गुणवत्तेत भर घालणारे आहे.विलोकन या ग्रंथाचे लेखक विलास खोले हे मराठी साहित्याचे जाणकार अभ्यासक म्हणून सुपरिचित आहेत
Added to cart successfully!