Your cart is empty now.
Vitamins By Achyut Godbole Dr Vaudehi Limaye व्हिटॅमिन्स डॉ. वैदेही लिमये
‘व्हिटॅमिन्स’ हे पुस्तक संशोधनावर आधारित, अत्यंत अभ्यासपूर्ण व विषयाची सर्वांग ओळख करून देणारं आहे. ‘व्हिटॅमिन्स’च्या शोधांच्या कथा, त्यांच्या शोधात आलेले अडथळे आणि संशोधकांच्या हालअपेष्टा आणि त्यातूनही त्यांनी मिळवलेले यश यांचा वाचनीय आलेख या पुस्तकात मांडला आहे.प्रत्येक व्हिटॅमिनची माहिती, त्यामागचा संशोधनाचा इतिहास, संशोधकांना आलेले अनुभव व त्यावरून काढलेले अनुमान - कधी कटू, कधी आश्चर्यजनक तर कधी अपघाताने मिळालेले अनुभव असे सर्व वाचताना अंगावर रोमांच उभे करतील.संशोधनात वापरण्यात येणाऱ्या सर्व शास्त्रीय पद्धतींचा या पुस्तकात मागोवा घेण्यात आला आहे.पाश्चिमात्य व भारतीय परंपरा यांचे दाखले दिल्यामुळे हे लिखाण आकर्षक झाले आहे. काही नोबेल पारितोषिक विजेते (तब्बल २०) तर काही त्या तोडीचे; पण प्रसिद्धी नसलेले असे संशोधक विशेषतः स्त्री संशोधक यांचा परिचय या पुस्तकात करून देण्यात आला आहे.बऱ्याचवेळा प्रत्यक्ष संशोधकच स्वतःवर प्रयोग करत होते.पूर्वी प्रयोगासाठी कधीकधी कैद्यांचा वापर, तर कधी अडाणी मजुरांचा वापर सर्रासपणे केला गेला जात होता. पोषण, आहार व निकृष्ट शरीर यांचा संबंधही या प्रयोगांमुळे सिद्ध झाला.आहारातील प्रत्येक ‘व्हिटॅमिन्स’चे कोणते पदार्थ किती प्रमाणात घ्यावेत, न घेतल्यास होणारे दुष्परिणाम याची सविस्तर माहिती या पुस्तकाद्वारे मिळते.विज्ञानातील अद्भुत रहस्य सोप्या आणि रसाळ भाषेतून उलगडत हे पुस्तक वाचकांना व्हिटॅमिन्सच्या चित्तथरारक कथांची मनोज्ञ सफर घडवतं.व्हिटॅमिन्सच्या शोधकथा त्यांचा थांग लागलेल्या संशोधकांच्या गाथा होऊन वाचकांना आकर्षून घेतात, अभावजन्य विकारांवर मात करण्याचा मार्ग दाखवतात.
Added to cart successfully!