Your cart is empty now.
पापणी जागी ठेवून आधुनिक माणसाचा शोध घेणारी खोल जाणीव या कवितांना व्यापून राहिली आहे. यंत्रयुगाने माणसाच्या डोक्यावरचे कष्टांचे ओझे खाली उतरवले. यंत्राने दिलेली ही मुक्ती माणसासाठी वरदान ठरली का ? की माणसाचे यंत्र झाले आणि त्यातून माणुसकीच्या अवमूल्यनाची प्रक्रिया सुरू झाली ? निवडुंगातून फूल यावे तसे कवीच्या काटेरी अनुभवाला आलेले करुणेचे फूल या कवितांना साद घालते. श्री. हिमांशु कुलकर्णी यांची भाषा करुणेचा स्वर लाभलेली सत्याची भाषा आहे.
Added to cart successfully!