Waghnakh by Pravin Bhosale वाघनख
Waghnakh by Pravin Bhosale वाघनख
Couldn't load pickup availability
अफजलवधाच्या पडद्यामागे ! प्रतापगडापाशी अफजलखानासह त्याच्या सैन्याचा शिवरायांनी केलेला नाश जितका सांगितला गेलाय, तितकाच अजूनही सांगायचा राहिला आहे. अफजलवधाचा श्रीगणेशा झाला तो वाघनखाच्या माऱ्याने आणि शेवट झाला खानाचे मुंडके कापण्याने! निर्णायक क्षणी कोण विजयी होणार याचा निकाल लावणारे महाराजांचे ते वाधनख, इतिहासात मानाचे स्थान पटकावून बसले आहे. हे जसे होते महाराजांचे वाधनख, तसेच असते ऐतिहासिक पुराव्यांचे वाघनख ! महाराजांचे वाघनख मुठीत लपलेले अगदी लहानसे हत्यार! असेच इतिहासाच्या मूळ कागदपत्रात झाकले गेलेले त्रोटक पण महत्त्वाचे पुरावे हीसुद्धा वाघनखेच! ही पुराव्यांची वाघनखे खोट्या इतिहासाच्या चिंध्या करतात, अनेक घटनांचे वेगळे अर्थ समोर आणतात आणि नव्या इतिहासाची भरदेखील घालतात ! यातून अनेक अनपेक्षित बाबी समोर येत जातात. आपल्याला माहिती असलेल्या अफजलवधाच्या पडद्यामागे काय काय दडले आहे ते दिसते. आणि या सर्वांचा मेळ घालून अफजलवध जसा आहे तसा स्पष्ट केल्याशिवाय अफजलवधाची गोष्टसंपतच नाही. या पार्श्वभूमीवर 'अफजलखान आला नव्हता, त्याला आणला होता! तो त्याच्या कर्मान मेला नव्हता, त्याला ठरवून मारला होता!' हे वाक्य कसे अर्थसत्य आहे, हे उघड करणारे अपरिचित पुरावे अफजलवधाचे अनेक दुर्लक्षित पैलू समोर आणतात. पुराव्यांची वाघनखेच तुमच्यासमोर आजपर्यंत रंगविला गेलेला त्या घटनेचा पडदा फाडून खरा अफजलवध दाखविण्याचे काम करतात ! अफजलवधाचा निरनिराळ्या कोनातून समग्र लेखाजोखा म्हणजे हे 'वाघनख'!
Share
