Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

yashakade bharari यशाकडे भरारी  Aruna Jadvani
Rs. 117.00Rs. 130.00

यश म्हणजे सुख, आनंद ! प्रत्येकाला ते हवेहवेसे वाटते. प्रत्येकाची यशाबद्दलची संकल्पना वेगवेगळी असते. नोकरीत उच्चपद मिळावे, निरोगी सामाजिक आयुष्य मिळावे, नातेसंबंध प्रेमाचे व अतूट असावेत, स्वतः उत्तम माणूस म्हणून जगावे - काहीही असले तरी ते मिळवणे हे उद्दिष्ट असते. आपल्या उद्दिष्टाप्रमाणे जगता आले की आनंद मिळतो.

तुम्ही प्रथम आपले ध्येय ठरवा. ते मिळवण्यासाठी उद्युक्त व्हा, त्यासाठी मार्ग शोधा व तुमचे ध्येय गाठा.

जग अत्यंत वेगाने बदलत आहे. या बदलत्या जगात, बदलत्या परिस्थितीत आपली उद्दिष्टेही बदलत जातात. त्यांना मिळवण्यासाठी नवे नवे मार्ग शोधावे लागतात.

यशाची संकल्पनाही बदलते आहे. आता यश म्हणजे एकच उद्दिष्ट मिळवणे नाही. यशाचा आता अनेक पटींनी विस्तार झाला आहे. अर्थपूर्ण आणि पूर्णत्वाचे आयुष्य जगण्यासाठी अनेक उद्दिष्टांचा समतोल साधावा लागतो. हा समतोल कसा साधावा हे कळण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग व्हावा.

यश म्हणजे पूर्णत्व.

‘पूर्ण’ मिळवण्याचे ध्येय बाळगा.

म्हणजे तुम्ही सुखी व्हाल.

Categories:
Translation missing: en.general.search.loading