Yugandhara by Dr. Sumati Kshetramade युगंधरा डाॅ सुमती क्षेत्रमाडे
Yugandhara by Dr. Sumati Kshetramade युगंधरा डाॅ सुमती क्षेत्रमाडे
Couldn't load pickup availability
'दुसऱ्यासाठी जगणे हा स्त्रीचा नैसर्गिक पिंड आहे' ही भूमिका मानणारी व त्याप्रमाणे अक्षरशः जगणारी युगंधरा....!!!
वेगळ्या स्वभावाची, आगळ्या जाती-प्रकृतीची, संस्काराची पाळमुळं खोलवर रुजलेली ही मुलगी भावुकतेपायी व्यवहारशून्यता पदरी घेऊन इतरांचा सांभाळ करत राहिली. ...दोन-दोन भाऊ असूनही त्यांनी जबाबदारी झटकल्यामुळे कुटुंबाचा सर्व भार स्वतःच पेलत राहिली...त्यासाठी स्वतःच्या सुखस्वप्नांचा आणि महत्त्वाकांक्षांचा चुराडा करायलाही तिने मागेपुढे पाहिले नाही.
तारुण्यसुलभ प्रेमामुळे निर्माण झालेली सुखी संसाराची स्वप्नं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मुलीच्या यशस्वी जीवनाची पित्यानं पाहिलेली स्वप्नं अशा कात्रीत अडकलेली युगंधरा पितृकर्तव्यालाच प्राधान्य देते. ...पण तिच्यासारख्या खडतर परिस्थितीत जगणाऱ्या मुलीला उच्च शिक्षणाची महत्त्वकांक्षा पूर्ण करणंही तितकं सोपं नव्हतं....अनेक संकटांना, अनेक अडथळ्यांना तोंड देऊन अविरत कष्ट करत शक्य त्या मार्गांनी आपल्या वडिलांसाठी, आपल्या घरासाठी ती झटत राहिली.... शारीरिक, मानसिक, भावनिक सर्व प्रकारचे त्रास सहन करत एकाकीपणे पुढे जातच राहिली.... मात्र अखेरपर्यंत अंतरीची व्यथा अंतरीच ठेवून आपली सर्व कर्तव्यं अगदी प्राणपणाने निभावली...!
Romantic Novel regardig a girl Named Yugandhara
Share
