Your cart is empty now.
‘पंचतंत्र आणि ईसापनिती’, मधील गोष्टी सगळ्यांना माहित असतात; पण कशा जन्माला आल्या हे माहित नसतं. त्यांतून मिळणारे ‘व्यवहार चातूर्य’ आणि ‘शहाणपणाचे व नितीमत्तेचे धडे’ मात्र युगानुयुगे उपयुक्त ठरले आहेत... मात्र माझ्या बाबांची ज्योतिषशास्त्रांतील ४० वर्षांची तपश्चर्या मी जवळुन बघितली आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण अन् क्षण त्यांनी शास्त्र-तहान भागविण्यासाठी कामी लावला आणि आपल्या अथक ज्योतिषशास्त्रीय चिंतनांतुन विकसित केलं, स्वत:च अस एक ‘फलीत-तंत्र’, जे अभ्यासुंना सतत मार्गदर्शक ठरत आहे. (‘शुक्र मकर रास- मकर नवमांश’, ‘मंगळ- बुध युति’, ‘चंद्र- राहु युक्त’; अशी काही उदाहरणादाखल सांगता येतील) ‘कुंडली तंत्र आणि मंत्र’ हे त्यांच पहिल पुस्तक. अनेक प्राचीन संस्कृत ग्रंथांमधील अनमोल ज्ञान त्यांनी जिज्ञासूंना समजेल अशा सोप्या व रसाळ भाषेंत तंत्र बध्द केलं; स्वत:ची चपखल उदाहरणे देऊन. हे एक या शास्त्रांतील पायाभूत कार्यच झाल. म्हणूनच ही पुस्तके एकपरीने ज्योतिषप्रेमींमध्ये ‘ज्ञानेश्र्वरी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. हे पुस्तक म्हणजे त्यांचेच ज्ञान आहे. मी फक्त ते माझ्या शब्दांत मांडत आहे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास पिढ्यानपिढ्या चालु आहे. शास्त्र कोणतही असो, ‘शिकणं’ हा झाला एक भाग. पण त्याहिपेक्षा महत्त्वाचं आहे; ‘शिकलेल्या गोष्टींचा प्रत्यक्षात वापर’ () कळणे, आणि त्याला एक स्वतंत्र दृष्टी विकसीत व्हावी लागते. म्हणुनच ज्योतिषशास्त्र शिकून अनेक ज्योतिषी बनतात. त्यांच्या कडे पदवी असते पण दृष्टी नसते; माहिती असते पण त्यात ज्ञान नसतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी; म्हणून प्रत्येक कुंडलीही वेगळी. त्या वेगळेपणांतल ‘मर्म’ कळायला हवं. जिज्ञासुंत अशी ‘दृष्टी’ निर्माण होईल याच दृष्टीने हे पुस्तक लिहावेसे वाटले. ‘स्वामी म्हणे अमलानंदा’, हे पुस्तक माझ्या बाबांनी लिहीले ‘स्वरुपानंद स्वामींच्या शिकवणुकीवर’. आज हे पुस्तक माझ्या हातुन लिहण्याचा योग येत आहे; ज्योतिषशास्त्रांतील, माझ्या बाबांच्या ‘फलीत-तंत्रावर’
Added to cart successfully!