डॉ. विजय अग्रवाल हे माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांचे खासगी सचिव होते. सिव्हिल सर्व्हिसमध्ये ते 1983 साली दाखल झाले. पुढे डॉ. अग्रवाल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सध्या अभ्यास, लेखन तसेच आयएएसची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते त्यांचा वेळ देत आहेत. त्यांची ‘पढो तो ऐसे पढो’, ‘स्टूडेंट और टाईम मॅनेजमेंट’, ‘स्टूडेंट और पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’ ही हिंदी भाषेतील पुस्तके अत्यंत लोकप्रिय आहेत. लेखक विजय अग्रवाल यांनी ‘रोजगार समाचार’ तसेच ‘रोजगार निर्माण’ या नियकालिकांसाठी दीर्घकाल लेखन केले आहे. त्यातील त्यांचे लेख अत्यंत लोकप्रिय आहेत. विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरील डॉ. अग्रवाल यांचे लेख देशातील सर्व महत्त्वपूर्ण नियतकालिकांमध्ये सातत्याने प्रकाशित होत असतात. डॉ. अग्रवाल मागील 20 वर्षांपासून आयएएसच्या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आले आहेत. ते स्वतः अनेक विश्वविद्यालये तसेच राष्ट्रीय स्तरावरील संस्थांसाठी सन्माननीय मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
* आयएएस परीक्षेच्या तयारी संदर्भात तुमची कोणतीही समस्या असू द्या, या पुस्तकात तुम्हाला त्याचे उत्तर मिळेलच. - पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा तसेच इंटरव्ह्यूच्या बाबतीतीलच नव्हे तर तुमच्या मानसिक समस्यांचीही उत्तरे तुम्हाला यात मिळतील. * हे पुस्तक तुमच्याशी सरळ सरळ संवाद साधतं, तोही सविस्तर आणि साध्या सोप्या भाषेत. इतकं की, काही समजलं नाही असं राहणारच नाही. * परीक्षेच्या तयारी संबंधित केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर प्रॅक्टिकली काम कसं करायचं हे या पुस्तकात दिलेलं आहे. ज्याचा वापर करून तुम्ही आश्चर्यजनक रिझल्ट मिळवू शकाल. खरंतर हे पुस्तक म्हणजे, आयएएसचं स्वप्न बघणार्यांसाठी एक ‘चालता-बोलता कोचिंग क्लास’ आहे, एक हँडबुक आहे, एक प्रकारचा ‘एनसायक्लोपीडिया’च आहे असं म्हणता येईल.