ही कहाणी म्हणजे एका अमेरिकन उद्योगाची यशोगाथा आहे. या कंपनीने कठोर परिश्रम, कल्पक बुद्धिचातुर्य, प्रयोग करा; मग चुका झाल्या तरी बेहत्तर, धैर्य आणि अंत:प्रेरणा या सर्वांचे मूल्य काय असते, हे सोदाहरणाने दाखवून दिले. विशेष म्हणजे मेहनत, निष्ठा, मूल्ये व कल्पकता हे उद्योगाचे आधारस्तंभ असतील, तर यश नक्की प्राप्त होते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. या पुस्तकातून एका हॅम्बर्गरच्या छोट्या स्टँडवरून कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल करणारा आंतरराष्ट्रीय उद्योग कसा उभा राहिला व त्याने केवळ अमेरिकेचीच नव्हे, तर जगाची ‘खाद्यसंस्कृती’ कशी बदलून टाकली, याची सविस्तर कहाणी वाचायला मिळेल. ही कहाणी विलक्षण व रोचक तर आहे. ती जिज्ञासूंची बौद्धिक भूक भागवेल, तर नव्या उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरेल.