Your cart is empty now.
सकाळी उठल्यापासून रात्री निर्धास्तपणे झोपेपर्यंत आपण जे काही केलं त्यात किती उद्योग-व्यवसाय इनव्हॉल्व्हड् होते याची मनीषाला जराही कल्पना नव्हती. विविध व्यवसायांच्या कार्यक्षम अस्तित्त्वाविषयी तिला जराही देणं-घेणं नव्हतं आणि अचानक एक दिवस शाळेत एक अभिनव उपक्रम राबवला गेला…हा उपक्रम होता वेगवेगळे व्यवसाय कसे चालतात हे जाणून घेण्याचा व विविध उद्योजकांची माहिती गोळा करण्याविषयीचा!या उपक्रमानंतर मनीषासारख्या ३१ मुला-मुलींचं जीवनच बदलून गेलं…अनेक उद्योजक या विद्यार्थ्यांचे हिरो बनले.आजच्या या जनरेशनपुढे नोकरी-व्यवसायाचे अनेक पर्याय खुले आहेत. पण पौगंडावस्थेतल्या या मुलांना व्यवसायजगत् म्हणजे नक्की काय हे माहीत असतं का? आपलं करिअर ठरवताना युवकांना व्यावसायिक जगाबद्दल उत्सुकता वाटावी, त्यांचं कुतूहल जागं व्हावं यादृष्टीने सुब्रोतो बागची यांनी या पुस्तकाद्वारे हा एक आगळा प्रयोग केला आहे.बोजड पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा मुलांना आवडेल, रुचेल अशा भाषेत उद्योगविश्वाची, प्रसिध्द उद्योजकांची व व्यवसायातील विविध संज्ञा-संकल्पनांची ओळख हसत्याखेळत्या वातावरणात करून देणारं पुस्तक…
Click here to be notified by email when this product becomes available.
Added to cart successfully!