Your cart is empty now.
'आपल्या सर्वांमध्ये हे असं लहानगं मूल कायम दडलेलं असतं. एखादा अनपेक्षित अनुभव आला, की ते डोळे विस्फारतं. एखाद्या परक्या भूमीवर पाय ठेवला, की सुरूवातीच्या काळात तर आपले डोळे सदैव विस्फारलेलेच! जपानला जाताय? या देशाबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय. तिकडचे अनुभव कसे असतील? जपानी लोकांशी मी कसं वागायला हवं? ते लोक माझ्याकडे कशा नजरेनं बघतील? त्यांच्या अतीकाटेकोरपणाशी आणि यांत्रिक शिस्तीशी मला जुळवून घेता येईल का? तिथे मला कच्चे मासे आणि बेचव पदार्थ खाऊन दिवस काढावे लागतील का? असे अनेक सतावणारे प्रश्न. थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सोबतीला असेल आधार देणारं, हलक्या-फुलक्या प्रसंगांमधून जपानी संस्कृतीतले बारकावे उलगडणारं हे पुस्तक. त्यांच्या स्मितहास्याच्या मुखवटयाआड दडलेल्या जपानी संस्कृतीतला जीवनप्रवास सुखकारक करणारं कल्चर शॉक : जपान. '
Added to cart successfully!