Your cart is empty now.
तुम्ही पुढील गोष्टी कशा करू शकता ते शोधा :• आंतरिक शक्तीचे निर्माण• अस्वीकृतीला तोंड देणे आपला एकमेवाद्वितीयपणा विकसित करणे• आपल्या प्रतिभेचा विस्तार• आरोग्याशी मैत्री• सर्वोत्तम बनण्याची संधी मिळवणे• प्रेमपूर्ण संबंध विकसित करणे• आत्मविश्वास मिळवण्यासाठी इतरांना मदत करणे.ही आणि इतर व्यवहार्य मार्गदर्शक तत्त्वे अद्भुत गोष्टी व रंजक प्रसंगांचे दाखले देऊन तुम्हाला हे सांगतील की, आत्मपूजनाच्या सापळ्यात न अडकता आपला आत्मविश्वास कसा वाढवावा. हे पुस्तक तुमचे खरेखुरे स्वत्व शोधण्यात तुमची मदत करेल.
अॅलन लॉय मॅस(१९३३-२००५) हे एक उत्कृष्ट कौटुंबिक समस्या उपचारक, व्यवसाय मार्गदर्शक, सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे लेखक व लोकप्रिय वक्ते होते. मंत्री म्हणून वीस वर्षे काम केल्यानंतर ते सल्लागार बनले आणि त्यांनी ग्लॅनडेल, कॅलिफोर्निया येथे व्हॅली काउन्सलिंग सेंटरची सहस्थापना केली. १९७० मध्ये त्यांनी ‘मित्रत्व’ या विषयावर संशोधन केले व त्यांचे ‘द फ्रेण्डशिप फॅक्टर’ हे पुस्तक १९७९ मध्ये ऑक्सबर्ग फोर्टरेस यांच्याकडून प्रकाशित झाले. ज्याची २००४ मध्ये नवीन आवृत्ती निघाली. एक लोकप्रिय वक्ता असलेल्या या लेखकाने पन्नासहून अधिक लेख लिहिले व इतर पुस्तकेही लिहिली, ज्यात ‘ऑक्सबर्ग बुक्स’ने प्रकाशित केलेल्या ब्रिगिंग आउट द बेस्ट इन पीपल’ व ‘द बॅलेन्स्ड लाइफ’ या पुस्तकांचा समावेश आहे.
Added to cart successfully!