Your cart is empty now.
“मला पुनर्जन्म मिळाल्यास सर्व पुस्तके बाजूला ठेवून मी एकाग्रतेची शक्ती आधी विकसित करेन. ही सिद्धी साध्य करूनच सर्व पुस्तके वाचून काढीन.”– स्वामी विवेकानंद
आधुनिक समाजव्यवस्थेमध्ये आणि शिक्षणपद्धतीमध्ये ‘एकाग्रता’ विकासासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसते. पाठांतरामधून मिळालेल्या क्षणिक यशापेक्षा नवनिर्मितीचे आणि बुद्धिजीवी शिक्षण घेण्यासाठी मुलांना प्रवृत्त करणे हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. एकाग्रतेच्या विकासामध्येच नवनिर्मितीच्या शिक्षणाची गुरुकिल्ली दडलेली आहे. एकाग्रतेशिवाय कोणतेही शिक्षण परिपूर्णपणे आणि कायमस्वरूपी मिळू शकत नाही.एकाग्रता विकासासाठी यापूर्वीही वेगवेगळे उपाय विकसित केले गेले आहेत. भारतात प्राचीन काळापासून विविध प्रकारचे योग, ध्यानधारणा आणि प्राणायामाच्या साहाय्याने एकाग्रता विकासाचे प्रयत्न केले जात आहेत.या पुस्तकातील तंत्र, मार्गदर्शन आणि प्रयोग हे प्रत्येकालाच सहजपणे करण्यासारखे आहेत. त्यामुळे एकाग्रता वाढीसाठी प्रत्येकालाच प्रस्तुत पुस्तकाची मदत होईल हे निश्चित.
Added to cart successfully!