आजच्या युगात, पालकत्व खूप कठीण, गुंतागुंतींचे झालेले आहे. मुलांना कसे वाढवायचे, त्यांचे संगोपन कसे करायचे, ह्याबद्दल सल्ला देणाNयांचा तोटा नाही. पण ह्याबाबतीत पालक मात्र सहसा, आजच्यापेक्षा कदाचित खूपच वेगळ्या सामाजिक परिस्थितीत जन्माला आलेले पायंडे व नियम पाळत असतात. आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे पालक व्हायला आवडेल, हे ढोबळमानाने ठरवण्यामध्ये हे पुस्तक पालकांना मदत करते. हे काम सोपे नाही. कोणताही पालक जाणीवपूर्वक वाईट आणि निष्काळजी असत नाही. पण तरीही, मुलांची कामगिरी चांगली झाली नाही, तो किंवा ती बंडखोरपणे वागत असेल, तर दु:ख होतेच. आपले कुठे आणि काय चुकले असेल बरे? अनंत पै यांचा, गेल्या २५ वर्षांपासून टीनएज (वय वर्षे १३ ते १९) मधील तसेच एकंदरीतच लहान मुलांशी खूप जवळून संबंध आलेला आहे. तरुण मुलामुलींनी त्यांच्याजवळ विश्वासाने आपली मने मोकळी केलेली आहेत, तसेच आपल्या समस्यांच्या संदर्भात त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा केलेली आहे. या मुलामुलींशी संवाद साधण्यांतून तसेच ते पालकांसाठी घेत असलेल्या सत्रांमधून त्यांना जे काही ज्ञान मिळाले, ते ज्ञान या पुस्तकाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे, `या पुस्तकांत दिलेल्या सूचना तुम्ही आचरणांत आणल्या, तर तुमची मुलं आक्रमक होण्याची वा अंमली िंकवा मादक पदार्थांच्या सेवनाकडे वळण्याची शक्यता जवळजवळ नाहीच.`