Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Abhyasache Super Powerful Mantra by Gulabrao Khedekar
Rs. 72.00Rs. 80.00
जागतिकीकरणामुळे हे युग स्पर्धेचे आहे. स्पर्धेत फक्त टिकन उपयोग होत नाही तर जिंकावे लागते; कारण ‘जो जिता वही सिकंदर’ असतो. म्हणून या स्पर्धेच्या युगातील प्रत्येक स्पर्धेत जिंकण्यासाठी हवे असते सामर्थ्य आणि क्षमता. कोणतेही कौशल्य, सामर्थ्य किंवा क्षमता मिळविण्यासाठी करावा लागतो अभ्यास.
अभ्यास म्हणजे नुसती ढोरमेहनत किंवा कठोर परिश्रम नव्हेत. अभ्यास करण्याच्या पद्धतीत नेमकेपणा, सुटसुटीतपणा आणि सोपेपणा असावा. अभ्यास करण्याची योग्य पद्धत शास्त्रशुद्ध आणि सूत्रबद्धपणे समजावून सांगणारे हे पुस्तक आहे.
एकदा हे पुस्तक वाचल्यावर विद्यार्थ्याला अभ्यासाचा कंटाळा येण्याचे कारणच राहत नाही. बोजडपणा, कंटाळवाणेपणा आणि निरुत्साह घालवून अभ्यासासाठी उत्साही वातावरणनिर्मिती करण्यासाठी मदत करणारे हे पुस्तक आहे.
हे पुस्तक वाचा आणि अभ्यास करण्याची योग्य पद्धत, स्वयंअध्ययन, एकाग्रता, स्मरणशक्तीचा विकास तसेच परीक्षेतील उज्ज्वल यश हे सर्व मिळविण्यासाठीचे सोपे मंत्र जाणून घ्या.
यशासाठी, जिंकण्यासाठी अभ्यासाचे पॉवरफुल मंत्र माहीत असायलाच हवेत!
Translation missing: en.general.search.loading