आपल्या क्षमतांचा योग्य वापर करून ज्यांनी संपूर्ण राष्ट्राची दिशा बदलली, आपल्या मानवी मर्यादांना ओळखून देशाचा प्रवाह बदलण्याचे काम केले, ज्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षांना असभ्य बनू न देता त्यांचे आपल्या विनम्र अभिलाषेच्या सावलीखाली पोषण केले, अशा अनेक व्यक्ती विभिन्न राष्ट्रांच्या इतिहासात अविस्मरणीय आहेत.
अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन हे सुद्धा याच शृंखलेतील एक महान व्यक्ती. अत्यंत गरीब परिस्थितीत यांचा जन्म झाला. बिकट परिस्थितीमुळे त्यांना फार उशिरा म्हणजे, वयाच्या पंधराव्या वर्षी अक्षरज्ञान प्राप्त झाले… तरीही शिकण्याच्या तीव्र इच्छेमुळे त्यांनी त्याही परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवले. हलाखीच्या परिस्थितीमुळे गणिताचे पुस्तकसुद्धा विकत घेणं अशक्य असल्याकारणाने त्यांनी मित्राकडून गणिताचे पुस्तक घेऊन ते वहीमध्ये जसेच्या तसे उतरवले होते.
प्रस्तुत पुस्तकात अब्राहम लिंकन यांचा जीवनसंघर्ष अधोरेखित केला आहे. देशातील गुलामगिरीविरुद्ध लढत असताना ते विधानसभेचे सदस्य बनले आणि गृहयुद्धाचा सामना करत असताना राजकारणाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचे एकदा नव्हे तर दोनदा राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांचा हा वादळी जीवनप्रवास या पुस्तकात विस्तृतपणे मांडला आहे.
भूक, गरिबी आणि संसाधनांची कमतरता असतानाही आयुष्यात मोठी स्वप्नं, इच्छा बाळगणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक ठरणारे पुस्तक!