Your cart is empty now.
'तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणाऱ्या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कादंबरी. '
Added to cart successfully!