Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Ward no. 5 KEM
Rs. 169.00Rs. 200.00
प्रथितयश डॉक्टर होणे आणि रुग्णांना बरे करून त्यांचे प्रेम, जिव्हाळा, विश्वास मिळविणे हे बहुतेक डॉक्टरांचे स्वप्न असते. डॉ. रवी बापट यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात ४० वर्षांपेक्षा अधिक काल त्यांनी रुग्ण सेवा केली. 

जठरासारख्या आतड्यावर शल्यचिकित्सा करताना रुग्णांना विश्वासात घेऊन त्यांनी अनेक नवे प्रयोग यशस्वी करून दाखविले. रूग्णालयातील वॉर्ड नंबर पाचमध्ये त्यांच्या बहुतांश वेळ गेला. तो वॉर्ड, तेथे दाखल होणारे रुग्ण, नर्स, वॉर्डबॉय, विद्यार्थी, कर्मचारी यांच्या आठवणी डॉ. बापट यांच्या मनात कायम घर करून राहिल्या आहेत. त्या त्यांनी 'वॉर्ड नंबर पाच, केईएम'मधून वाचकांपर्यंत पोचविल्या आहेत. 

डॉक्टरांचे बालपण, शिक्षण, व्यवसाय, आप्त, कुटुंब, पत्रकार, राजकारणी मित्र व रुग्ण, स्वतःचे अवांतर उद्योग, आजारपण, रुग्णांशी संवाद, आजचे वैद्यकशास्त्र याविषयी त्यांनी मनमोकळेपणाने लिहिले आहे. यशस्वी डॉक्टरांचे हे अनुभवसमृद्ध लेखन वाचताना या क्षेत्राविषयी, डॉक्टर-रुग्ण नाते याचे वेगळे दर्शन होते. याचे शब्दांकन सुनीती जैन यांनी केले आहे.
Categories:
Translation missing: en.general.search.loading