महान व्यक्तींचे प्रेरणादायी सुविचार आपल्याला क्षणोक्षणी स्फूर्ती देतात. जीवनातल्या अडचणींवर मात करून मोठी स्वप्नं पाहण्यासाठी हे विचारधन मार्गदर्शक ठरते. ज्याप्रमाणे उत्तम आरोग्यासाठी पोषक आहाराची आवश्यकता असते; त्याचप्रमाणे सुदृढ मानसिक दृष्टिकोनासाठी सर्वोत्कृष्ट सुविचारांचं वाचन, मनन आणि चिंतन यांचं महत्त्व अनन्यसाधारण असतं.
प्रस्तुत पुस्तकात स्वामी विवेकानंद, जे. कृष्णमूर्ती, अब्राहम लिंकन, महात्मा गांधी, अल्बर्ट आइन्स्टाइन, रवींद्रनाथ टागोर, खलिल जिब्रान, थोरो, इमर्सन, फ्रेड्रिक नीत्शे, कन्फ्युशिअस, गटे, शेक्सपिअर, फ्रान्सिस बेकन, इलेनॉर रुझवेल्ट, पाउलो कोएलो अशा अनेक जागतिक कीर्तीच्या विचारवंतांची सुविचाररत्ने समाविष्ट आहेत.