मानाची व जबाबदारीची पदे, प्रतिष्ठा व आर्थिक
स्थैर्याची हमी मिळवू शकता, असे करायचे असेल तर स्पर्धा
परीक्षांकडे गांभीर्याने बघावे लागेल. मात्र ग्रामीण भागातील
वा सर्वसामान्य लोकांना MPSC व UPSC म्हणजे काय
याची माहिती नसते वा त्यांना या परीक्षांबाबत न्यूनगंड वा
उदासीनता असते
या पुस्तकात स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, पूर्व परीक्षा,
कल चाचणी परीक्षा इ. विषयी सोप्या भाषेत माहिती दिली
आहे. शिवाय या परीक्षांविषयी जागृती व शंकानिरसन
करतानाच महाविद्यालयांची व पालकांची भूमिका व योगदान
यावरही भाष्य केले आहे. तसेच यशस्वी उमेदवारांच्या
मुलाखतीतून इच्छुक उमेदवारांना योग्य मार्गदर्शन कसे
मिळवता येईल याकडेही लक्ष वेधलेले आहे…
MPSC व UPSC परीक्षेची तयारी कशी करावी?
कोणती पुस्तके वाचावीत? प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत
याविषयी केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरातल्या
विद्यार्थ्यांनादेखील योग्य मार्ग दाखवेल असे उपयुक्त पुस्तक.
एकेकाळी असे म्हटले जायचे की, उत्तम शेती, मध्यम
व्यापार आणि कनिष्ठ नोकरी; पण आजच्या काळात हा संदर्भ
पूर्णपणे उलट झाला आहे आणि ‘उत्तम नोकरी, मध्यम
व्यापार व कनिष्ठ शेती’ असे म्हणायची वेळ आली आहे.
आणि त्यातही MPSC व UPSC च्या परीक्षा देऊन
अगदी तरुण वयातच….