Your cart is empty now.
स्त्रीच्या लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती, काली अशा रूपांबरोबरच देवदत्त पट्टनायक यांनी पाश्चात्त्य पुराणात येणाऱ्या ‘गाया’ या स्त्रीरूपाचीही चर्चा या पुस्तकात केली आहे. समृद्धी (लक्ष्मी), ज्ञान (सरस्वती), प्रेम (दुर्गा) आणि शक्ती (काली) अशा स्त्रीमध्ये एकवटलेल्या गुणांचा विचार या पुस्तकात करतानाच एकूणच स्त्रीकडे पाहण्याचा पुरुषी दृष्टिकोन कसा बदलत गेला आणि मानवी समाजाचा प्रवास मातृसत्ताक पद्धतीकडून पितृसत्ताक दिशेने कसा झाला, स्त्रीवर बंधने का येत गेली याही प्रश्नांचा ऊहापोह पट्टनायक यांनी केला आहे.विष्णू हा सृष्टीचा पालनकर्ता तर शिव हा संहारकर्ता असे मानले जात असले तरीही शिवाचे संसारी रूप हे अधिक पूज्य का मानले जाते किंवा ब्रह्मा हा सृष्टीनिर्माता असूनही पूजनीय का नाही, लक्ष्मी आणि सरस्वती यांचा एकत्रित सहवास का नसतो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘देवीची सात रहस्ये’ या पुस्तकात मिळतात.‘परमेश्वर आहे की नाही,’ या वादात न पडता देवदत्त पट्टनायक पुराणात जे सांगितले आहे ते अतिशय सोप्या शब्दांत, अनेक कथा-कहाण्यांची उदाहरणे देत वाचकांपुढे ठेवतात. त्यातून वाचकाला विचारप्रवृत्त करतात. हजारो वर्षांपूर्वी माणसाच्या जगण्याचे प्रयोजन काय, या प्रश्नावर विचार करताना आपल्या पूर्वजांनी जे तत्त्वज्ञान मांडले ते पाहून वाचक त्यापुढे नतमस्तक होतो.
Added to cart successfully!