Your cart is empty now.
नांगरल्याविन भुई’ हे कृष्णात खोतांनी रेखाटलेल्या शब्दचित्रांचे पुस्तक. ही शब्दचित्रे स्वतःच्या सुखदुःखांच्या पलीकडे जाऊन साध्या,
सोप्या भाषेत आपल्या जगण्यातूनच जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतात.
नैसर्गिकपणे जगणाऱ्या या माणसांची स्वतःची अशी एक भाषा आहे. ही भाषा आपल्याला समूहसंस्कृतीचे भान आणून देते.
हे या लेखनाचे वेगळेपण आहे.
जीवनातल्या कारुण्याबरोबरच सामान्य वाटणाऱ्या या माणसांच्या जगण्याचे अस्सल तत्त्वज्ञान अंतर्मुख करून टाकते.
या माणसांचे जगणे आणि ही माणसे आपल्या मनात खोलवर रुतून बसतात. अस्वस्थतेसह आपली सोबत करायला लागतात.
Added to cart successfully!