Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rs. 450.00Rs. 499.00
ऐंशीच्या घरात असलेली आजी. पतिनिधनानंतर नैराश्याच्या गर्तेत रुतत चालली आहे. ती बरी व्हावी, पुन्हा कुटुंबात मिसळायला लागावी म्हणून सगळं कुटुंब शर्थीचे प्रयत्न करतं आहे. जिव्हाळा, घुसपूस, आपसातल्या कुरबुरी सगळ्याच एकत्र कुटुंबास “असतात आजीने ह्या सगळ्याकडे पाठ फिरवली आहे, तिला आता काहीच नको आहे. हळूहळू ‘काहीच नको’चं ‘सगळं नवं ‘ मधे रूपांतर होतंय. आता कुटुंबात वावरेन ही नव्या स्वरूपात असा ध्यास. आजी नैराश्यातून बाहेर येते सामाजिक बंधनं तोडून टाकलेली, नवं बालपण, नवं तारुण्य ल्यालेली अगदी वेगळी आजी. नवी नाती आणि नवी 5 वृत्ती अत्यंत मुक्त आणि स्वच्छंद ! कथा कथनाच्या एका वेगळ्याच शैलीची हाताळणी ह्या कादंबरीत बघायला मिळते. कादंबरीचे कथानक, कालावधी, भावभावना, कथन सगळंच आपल्याला माहीत असलेल्या सर्व मर्यादा, सीमांचे उल्लंघन करणाऱ्या काहीशा वेगळ्या ढंगात! नित्य सवयीही विलक्षण आणि नवीन वाटणाऱ्या! हे ओळखीचं जगही जादूने भारलेलं वाटायला लागतं, त्यांच्यातील दरी भरून येते. काळाचे सातत्य प्रकर्षाने पुढ्यात येत राहते. प्रत्येक घटनेचे भूतकाळातील घटनांशी अतूट नातं आणि प्रत्येक क्षण म्हणजे निद्रिस्त युग. उदाहरणच द्यायचं झालं तर वाघा बॉर्डरचे देता येते आणि सामान्य कुटुंबाचेही देता येते. रोज संध्याकाळी होणारं हिंदुस्तान आणि पाकिस्तानच्या राष्ट्रवादार्थ आक्रमक प्रदर्शन, सामूहिक हत्याकांडाच्या आक्रोशाचा गदारोळ एकत्र कुटुंबाच्या रोजच्या आयुष्यात डोकावणाऱ्या भूतकाळाच्या सावल्या!
Categories:
Translation missing: en.general.search.loading