Your cart is empty now.
Goggle Lawalela Ghoda गॉगल लावलेला घोडा by Nikhilesh Chitre निखिलेश चित्रे
‘गॉगल लावलेला घोडा’ या कथासंग्रहात एकूण नऊ कथा आहेत.या सर्वच कथा जीवनातल्या अपूर्णत्वाला पूर्णत्व देण्याच्या तीव्र प्रेरणेतून लिहिल्या गेल्या आहेत. हे निखिलेश चित्रे यांनी उभारलेलं एक समांतर विश्व आहे. या विश्वाच्या आणि त्यात वावरणाऱ्या माणसांच्या वर्तणुकीमागे एक स्वतःचा तर्क, कार्यकारणभाव आहे. एकदा का त्याची नस पकडली की वाचकाला या कथांपासून मिळणारा आनंद आणि आयुष्याबद्दलची खोलवरची उमज ही मराठी कथासाहित्यात अन्यत्र अनुभवायला मिळणं अशक्य आहे. ‘गॉगल लावलेल्या घोड्या’प्रमाणेच जगाच्या नकाशात कुठेही नसणारा ‘सिनारा’ देश, कथेतल्या पात्रानं लेखकाविरुद्ध पुकारलेलं बंड, पुस्तकं खाणारा सुरवंट, कथाकाराला अनाकलनीय रहस्याच्या विवरात खेचून घेणारा गूढ पाषाण, प्रतिभेची मुंगी चावल्यानं लेखकाला मिळणारं यश – अशा सगळ्या गोष्टी खास निखिलेश चित्रे यांच्या कथांमध्येच घडू शकतात.
Added to cart successfully!