Your cart is empty now.
घड्याळाचं रूपक वापरायचं तर सेकंद काटा रोज घडणाऱ्या वर्तमानाचं प्रतीक आहे. मिनिटकाटा हा विशिष्ट समाजात वेळोवेळी घडणाऱ्या बदलांचं प्रतीक आहे. या समाजविचारात कलेचाही अंतर्भाव होतो. तर तास काटा संस्कृतीचं, परिवर्तनाचं, युगांतराचं प्रतीक असतो. हे बदल शतकानुशतकांच्या कालावधीत होतात. मानवी जीवनाच्या या साऱ्या समग्रतेचा वेध कलाविचाराबरोबरच भूविज्ञान, पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र, सामाजिक मानववंशशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, विज्ञान व मानसशास्त्र अशा विविध ज्ञानशाखांच्या आधारे या पुस्तकात घेण्यात आलेला आहे. त्यातून मानवी अस्तित्वाचा जीवसृष्टीच्या उत्पत्तीपासून आणि आदिमानवाच्या स्थलांतरापासून ते आजच्या प्रगत जीवनशैलीपर्यंतचा प्रवास आलेला आहे. राजा रविवर्मा, मालतीबाई बेडेकर, इरावती कर्वे, गणेश देवी, कृषिसंस्कृती, न्यूरो अस्थेटिक्स अशा विविधांगी विचारव्यूहामागचं सूत्र एकच आहे- कला-समाज-संस्कृती.
Added to cart successfully!