Your cart is empty now.
Napeksha नपेक्षा by Ashok Shahane अशोक शहाणे
अन् ज्ञानेश्वराची ही तिखट धार त्याच्या स्वतःच्या लिखाणातनंसुद्धा लपत नाहीच. ‘ज्ञानेश्वरी’ न् ‘अमृतानुभव’ ग्रंथ असल्यामुळं त्यांत लिखाणाचा एक धरबंद आपसुकच आहे, पण ‘गाथे’त ज्ञानेश्वर जास्ती मोकळा आहे. प्रत्येक अभंगावरची त्याची सहीच पहा. तसे अर्थात् या सहीचेही थोडेफार फेरफार आहेत. पण खास ज्ञानेश्वराची सही म्हजे ‘बाप रखमादेवीवरू’ आपल्याला छळणाऱ्यांना त्यानं दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे. मराठी माणसाचा, भाषेचा उग्रटपणा इथं जन्माला आला. ज्ञानेश्वरानंच तो जन्माला घातला. तुम्ही त्याला भले ‘माउली’ म्हणा, पण खरंतर तो बाप आहे. तुमचा- आमचा भाषेचा. सगळ्याच मराठीपणाचा. नामदेव हे हुबेहूब ओळखून होता. म्हणूनच ज्ञानेश्वराच्या समाधीबद्दल सांगताना त्यानं टिपून ठेवलंय : ‘दिवाकर पावला अस्त! बाप ज्ञानेश्वर समाधिस्त!’
Added to cart successfully!