Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rujuwat Aaswad  Sameeksha  Memansa  रुजुवात आस्वाद  समीक्षा  मीमांसा by Ashok R Kelkar अशोक रा. केळकर
Rs. 540.00Rs. 600.00

 Rujuwat Aaswad  Sameeksha  Memansa  रुजुवात आस्वाद  समीक्षा  मीमांसा by Ashok R Kelkar अशोक रा. केळकर

“अशोक रा. केळकर हे एक चिकित्सक आणि चिंतनशील विचारवंत म्हणून महाराष्ट्रात परिचित आहेत. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, जीवशास्त्र, सांस्कृतिक इतिहास इत्यादी अनेक विद्याशाखांत ज्याची पाळेमुळे विस्तारलेली आहेत अशा भाषाशास्त्राचे अधिकारी पंडित असल्यामुळे कोणत्याही वैचारिक / सामाजिक समस्येकडे ते एकाच वेळी आतून आणि बाहेरून पाहू शकतात. त्यांच्या विचारात जो ताजेपणा नेहमी आढळतो त्याचे हे बहुधा मूळ असेल.” नवभारतचे संपादक असताना मे. पुं. रेगे १९९३ साली असे लिहून गेले त्या वेळी त्यांच्या नजरेसमोर केळकरांचा ‘मिस्टिकल’ अनुभवाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा लेख होता. त्या अनुभवाला ‘सहोदर’ अशा साहित्यादी विविध कलांच्या अनुभवाशी भिडताना केळकरांच्या वैचारिक / सामाजिकतेचा त्यांच्या गाढ रसिकतेशी हृद्य असा संगम होतो त्याचा अनुभव वाचकांना रुजुवातमधील लेख वाचताना पुनःपुनः येईल, आस्वादाकडून समीक्षेकडे आणि समीक्षेकडून मीमांसेकडे त्यांचा प्रवास घडेल, आणि केळकरांची एक नवीच ओळख पटेल.

Categories:
Translation missing: en.general.search.loading