Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Mary Lasker मेरी लास्कर by Daniel Mascarenhas डॅनिअल मस्करणीस
Rs. 288.00Rs. 320.00

वैद्यक आणि राजकारण या पुरुषबहुल क्षेत्रात ठसा उमटवून खऱ्या अर्थाने ‘स्त्री
शक्ती’ अधोरेखित करणाऱ्या एका अमेरिकी कार्यकर्तीची प्रेरक कहाणी म्हणजे मेरी
लास्कर हे चरित्र होय.

'आजार,' म्हणजे आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक ढळढळीत वास्तव आपल्या दुःखाचे, चिंतेचे एक प्रमुख कारण. बऱ्याचदा नाइलाजाने आपण त्याला 'देवाची इच्छा' म्हणून स्वीकारतोही. जगाची रीतच ती!

स्पॅनिश फ्लूच्या साथीमध्ये सापडलेली एक अठरा वर्षाची तरुणी मात्र ही रीत मोडण्याचा निश्चय करते. 'वैद्यकीय संशोधनाची असलेली वानवा' हे कारण लक्षात येताच त्या ध्येयासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचण्याचे ठरविते तेही विज्ञानाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ! एका अथनि शुद्ध वेडेपणाच तो आणि धाडसीही!

तिचे आयुष्य म्हणजे वैद्यक आणि राजकारण या दोन्ही पुरुषबहुल क्षेत्रात ठसा उमटवून खऱ्या अर्थाने 'स्त्री-शक्ती' अधोरेखित करू पाहणारे! वैद्यक संशोधनाला चालना देण्यासाठी प्रयोगशाळेऐवजी संसदेत विविध आजारांविरुद्धचं युद्ध ती कशी लढते त्याची ही प्रेरणादायी कहाणी, कोव्हिडच्या साथीतून नुकत्याच बाहेर पडलेल्या आपणा सर्वांनी वाचण्यासारखी!!

Translation missing: en.general.search.loading