Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rs. 153.00Rs. 170.00
भारतातील उद्विग्न करणार्‍या वास्तवात,
कधी कधी ओठात प्रश्‍न येतात...

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते तर...?
नेताजी बोस भारतातच राहिले असते आणि स्वातंत्र्यानंतर
त्यांनी देशाचे नेतृत्व केले असते तर...?
अखंड भारताचे पंतप्रधानपद महम्मदअली जिना
यांना देऊ केले असते तर...?

‘पूर्णत: काल्पनिक’ म्हणून अशा प्रश्‍नांची वासलात लावता येईल,
पण आजची अस्वस्थता, असंतोष यांची बीजे नजीकच्या काळातील आहेत की
भारतीय प्रजासत्ताकाच्या जन्मकाळाशी निगडित आहेत,
हा प्रश्‍न प्रासंगिक ठरू शकतो.

1947 ते 1950 या त्या काळात गंभीर चुका झाल्या का?
1947 मध्ये जाऊन, स्वतंत्र राष्ट्र म्हणून नव्याने सुरुवात करणे आता शक्य नाही,
पण त्या समजावून घेण्याने भविष्यात त्यांची पुनरावृत्ती टाळता येईल.
‘काल’चा शोध अधिक सुखी ‘उद्या’च्या जडणघडणीला उपकारक ठरेल.
Translation missing: en.general.search.loading