Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Udakachiya Aartee उदकाचिया आर्ती by Milind Bokil
Rs. 315.00Rs. 350.00

Udakachiya Aartee उदकाचिया आर्ती by Milind Bokil

’उदकाचिया आर्ती’ या ’मौज’ दिवाळी (१९९१) अंकात प्रसिद्ध झालेल्या कथेने, मिलिंद बोकील यांच्या लेखनाकडे चोखंदळ वाचकाचे लक्ष अधिक वेधून घेतले. धरणाखाली गडप होऊ घातलेल्या गावाला वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न करण्यासाठी स्वत:चे आयुष्य झोकून देणा-या रोहिणी या मनस्वी स्त्रीची ही कथा. कोणत्या ना कोणत्या कार्याचा ऊर्मीने स्वत:ला वाहून घेणा-या कार्यकत्या व्यक्तींची उपस्थिती, बोकिलांच्या कथांतून सतत डोळयांत भरते. त्यांच्या कथांतून होणा-या शोषित समूहाच्या चित्रणातही कळकळ, तिला आलेला व्यापक करुणेचा रंग वाचकाच्या अंतर्यामापर्यंत पोचतो. आणि कार्यकत्यांसमवेत विविध व्यक्तिगत कोंडीत सापडलेल्या स्त्रीपुरुषांचेही त्यांच्या कथांत घडणारे मर्मग्राही दर्शन हेलावून टाकते. मिलिंद बोकील यांच्या कथांना अनुभवांचे व्यापक क्षेत्र लाभलेले आहे. ते स्वत: इलेक्टॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरिंगमधले तज्ज्ञ. समाजशास्त्राचे पदवीधर. त्यातला पदव्युत्तर अभ्यासही त्यांनी संशोधनाव्दारे पूर्ण केलेला. युसुफ मेहेरअली सेंटरतर्फे. त्यांनी आदिवासींमध्ये कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. सामाजिक कार्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या खेडयापाडयातून भ्रमंती केली आहे. या संचितातील छाया त्यांच्या कथांतून कलात्मकपणे उमटताना दिसतात. मानवी हासभासांचा, भावभावनांचा, मानवी अतर्क्य वर्तनाचा अन्वय त्यांच्या कथांतून लावला जात असताना जाणवतो. जीवनाची जणू उमग होत आहे. अशी जागोजाग जाणीव होत राहते. कधी पारंपारिकतेला गांभीर्याने छेद देत, नव्या सर्जनशील अनुभवाच्या शक्यतेची दिशा दर्शवणारे मिलिंद बोकील यांचे हे भरीव लेखन, मराठी कथेला अधिक समृद्ध करत आहे असा प्रत्यय रसिकाला खचितच देईल.

Categories:
Translation missing: en.general.search.loading