Your cart is empty now.
आयुष्य म्हणजे स्वतःची ओळख शोधण्याची एक प्रक्रिया. प्रत्येक अनुभवातून काही तरी नवीन शिकणं आणि त्यातून अधिक सजग आणि सक्षम होणं. आयुष्याचा खरा अर्थ आपल्याच जीवनातील चांगल्या वाईट अनुभवांमधून शोधायला हवा, त्यातूनच खरं आयुष्य उमगतं. मला कॅन्सर झाला, याचं मला काडीमात्र दुःख नाहीये. खरंच, कारण हे सगळंच क्षणभंगुर आहे. एक मृगजळ आहे, हे मला ह्या प्रवासाने दाखवून दिलं. आता उर्वरित आयुष्य मी बोनस मानून माझ्या बळावर जगणार आहे. कारण आयुष्यात जगणंच जास्त मौल्यवान असतं. आणि शेवटी एकच... आनंदी जगा, हसत जगा... कारण आयुष्याचा हा चलचित्रपट एकदा संपला की याचे पुनर्प्रक्षेपण नाही. जीवन अनिश्चित आहे. आशा-निराशेने भरलेले आहे. जगण्याची आसक्ती आहे. म्हणूनच आयुष्य खूप सुंदर आहे. तुमच्या वेदनेत, संघर्षात, आनंदात जीवनाचे सौंदर्य दडले आहे. 'ब्युटी ऑफ लाईफ' म्हणतात ते हेच...!
Added to cart successfully!