Your cart is empty now.
जिथे आहोत तिथून जिथे जायचंय तिथपर्यंत पोहोचण्यासाठी धाडसाने आणि मनापासून काम कराल तर यश मिळेलच ! तुमचं ध्येय कोणतंही असो चांगला विद्यार्थी बनणं, खेळाडू बनणं, - नवीन व्यवसाय सुरू करणं, भरपूर पैसा कमवणं... यासाठी तुम्हाला योग्य ती दिशा आणि मागर्दशन हवे असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. या पुस्तकात दिलेली तत्त्वं नेहमीच काम करतात, अर्थात जर तुम्ही त्यावर काम केलं तर ! या पुस्तकात यशस्वी होण्याची २३ धोरणं किंवा स्ट्रॅटेजीज् आहेत, ज्या आजपर्यंत हजारो तरुणांनी वापरल्या आहेत. योग्य ती साधनं हातात असतील तर प्रत्येक जण यशस्वी होऊ शकतो. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी स्फूर्ती देईल. केंट हेली : केंट हेली यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी आपला पहिला व्यवसाय सुरू केला. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी 'कुल स्टफ' हे पहिलं पुस्तक लिहिलं, जे प्रचंड लोकप्रिय ठरलं. सक्सेस या विषयातील एक तरुण आणि लोकप्रिय तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. वयाच्या तेविसाव्या वर्षी ते तरुण पिढीचे प्रवक्ते बनले आहेत. जॅक कॅनफिल्ड : जॅक कॅनफिल्ड हे उत्कृष्ट प्रशिक्षक असून ते तरुणांना, व्यावसायिकांना, उद्योजकांना आणि कॉर्पोरेट लीडर्सना मार्गदर्शन करतात. 'चिकन सूप फॉर द सोल' चे ते सहनिर्माते आहेत. अमेरिकेतील रेडिओ आणि टीव्हीवरील अनेक टॉक शोजमध्ये त्यांचा सहभाग असतो.
Added to cart successfully!