Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Aanandswar Jeshthansathi By Rohini Patwardhan
Rs. 0.00
आयुष्याची ‘पहिली इनिंग’ खेळून झाली आहे... जबाबदाNया, कर्तव्यं पार पाडून झाली आहेत. केलेले, झालेले, दिलेले असे सगळे हिशोबही करून झाले आहेत. आता खूप सारा वेळ आहे. आयुष्याच्या संध्याकाळी डोळ्यासमोरून पुर्वायुष्य जातं, आणि जाणवतं... प्रेमाची, हक्काची माणसं जवळ नाहीत विंâवा जवळ असूनही नसल्यासारखीच... 
मग ‘दुसरी इनिंग’ खेळण्यासाठी खNया अर्थाने आपणच उरतो आपल्यासाठी!
ज्येष्ठत्वाकडे नेणारा हा प्रवास आता सुरू होतो आहे याची जाणीव करून देत, आयुष्याच्या या ‘सेकंड इनिंग’ची सुरुवात किती ‘चैतन्यमयी’ होऊ शकते याचा प्रत्यय देणारं हे पुस्तक आहे. ही ‘सेकंड इनिंग’ सकारात्मकरित्या जगून अर्थपूर्ण कशी करता येईल याबद्दल अत्यंत सहज-सोप्या पद्धतीने 
मार्गदर्शन यात मिळतं.
उतारवयातल्या विविध आजारांविषयीची थोडक्यात माहिती, वृद्धकल्याणशास्त्र या अभ्यासाच्या नव्या शाखेचा परिचय, इच्छापत्र व मृत्यूपत्राबद्दलचे समज-गैरसमज, वृद्धाश्रमांची माहिती अशा अनेक कळीच्या विषयांवर लेखिका छोट्या सुटसुटीत लेखांमधून संवाद साधते.
आजकाल आयुर्मान वाढतं आहे आणि त्याला जोडून येणारे मानसिक, शारीरिक क्लेशही वाढत आहेत... मात्र यावर मात करून आयुष्याची ही ‘सेवंâड इनिंग’ समृद्ध करता येते... ती कशी करावी याचा तालबद्ध मंत्र देणारं पुस्तक...आनंदस्वर ज्येष्ठांसाठी!

Click here to be notified by email when this product becomes available.

Categories:
Translation missing: en.general.search.loading