Your cart is empty now.
चीनच्या धूर्त धोरणीपणामुळे शिष्टाईच्या प्रांतात भारत चीनकडे – विशेषतः १९६२च्या युद्धानंतर संशयाच्या नजरेने पाहत आला आहे. असं असूनही या उभय देशांच्या संबंधांचं सखोल आकलन फार कमी वेळा मांडण्यात आलं. काही घटना-प्रसंगांमुळे तत्कालीन चर्चा-वादविवाद झाले, अजूनही ते होत असतात, पण त्याच्या खोलात फारसं कुणी जात नाही.
भारताचे माजी परराष्ट्र सचिव तसंच चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेल्या विजय गोखले यांनी या पुस्तकात उभय देशांमध्ये झालेल्या वाटाघाटींचा, त्यामधील बदलांचा वेध घेतला आहे. भारत-चीन यांच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजपर्यंत सहा महत्त्वाच्या वाटाघाटींच्या खेळ्या झाल्या. या प्रदीर्घ वाटाघाटींच्या परिप्रेक्ष्यातून भारत-चीन संबंधांचा चिकित्सक ऊहापोह ते करतात, तसंच सद्यस्थितीकडेही पाहतात.
भारताशी शिष्टाईच्या पातळीवर वाटाघाटी करताना चीन कोणते डावपेच आखतो, कोणत्या क्लृप्त्या लढवतो आणि कोणती साधनं वापरतो, याचा शोध गोखले पुस्तकात घेतात. त्याचा फायदा पुढील काळातील वाटाघाटींमध्ये भारतीय अधिकाऱ्यांना व्हावा, तसंच नागरिकांमध्ये या विषयाबद्दल जनजागृती व्हावी, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. सातत्याने बदलणाऱ्या भारत-चीन संबंधांचा विश्लेषणात्मक मागोवा घेणारं पुस्तक… भारत-चीन संबंधांची प्रदीर्घ खेळी
Added to cart successfully!