Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Dedah Damdi : By Shreekant Jogvekar
Rs. 0.00

मनमोहन सिंग यांच्या काळातला ‘कोळसा-घोटाळा’ असो, की मोदींच्या जनधन-योजना, स्वच्छता मोहिमा, परदेशवाऱ्या असोत, किंवा संघाची खिल्ली
उडवणाऱ्या शरद पवार यांची भाजपशी अधूनमधून केलेली सलगी असो… गणेशोत्सवाचं बदलणारं स्वरूप असो की संजय दत्तला कारावासात मिळणाऱ्या
सवलती असोत… तंबी दुराई त्याचा तिरकस नजरेचा चष्मा लावणारचं ! मग त्याचा तल्लख मेंदू कामाला लागणार आणि त्या चष्म्यातून अशा प्रसंगांतील
विसंगती हुडकून काढणार. त्या विसंगतींवर बुद्धिनिष्ठ विनोदाचं आवरण चढवून आपल्यापर्यंत त्या ‘दीड-दमडी’तून पोचवणार !
या दीड-दमडीत कल्पनाविलासाचं माध्यम विविधप्रकारे वापरलं जातं… काल्पनिक प्रसंग निर्माण करून त्यात विनोदनिर्मितीची अजोड ताकद असलेल्या
संवादांची चपखल पेरणी होते, विविध भाषा, विविध बोली दावणीला बांधल्या जातात, तर कधी काव्य-अभंग-ओवी-वग असे साहित्यप्रकार ढंगदारपणे पेश होतात, तर कधी ‘पत्र-व्यवहारा’तून तिरकस बाण सोडले जातात. तंबी दुराईचं ‘मोनोटनी’शी वावडं असल्यामुळे तो विविध प्रयोग करतो…एकाचएक शैलीत अडकत नाही.
राजकारण, समाजकारण, साहित्य-संस्कृती क्षेत्रांत घडणाऱ्या प्रसंगांतील विसंगतींना उघडं पाडत नकळतपणे उपरोधिक भाष्य करायचं आणि तेही उच्च दर्जाची विनोदनिर्मिती साधून… ही या तंबी दुराईची खासियत !
हे लिखाण हसवत हसवत अंतर्मुख कधी करतं, विचारप्रवृत्त कधी करतं, नव्या जाणीवा कधी करून देतं हे कळतही नाही आणि म्हणूनच ही आहे रंजन करणारी, प्रबोधन करणारी आणि त्यासोबत बौद्धिक आनंद देणारी… 

Click here to be notified by email when this product becomes available.

Translation missing: en.general.search.loading