Your cart is empty now.
यशोप्राप्तीचे ५० मैत्रीपूर्ण कानमंत्र
यशस्वी होण्याची पहिली पायरी असते एखादी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त होणं! त्यानंतरच आपल्या प्रयत्नांना मेहनतीची जोड देऊन आपलं ठरवलेलं उद्दिष्ट गाठता येऊ शकतं. आणि म्हणूनच यशोप्राप्तीच्या मार्गात आवश्यकता असते ती, उद्युक्त करणार्या, प्रेरणा देणार्या एखाद्या मार्गदर्शकाची!व्यक्तिमत्त्व विकास व व्यावसायिक क्षेत्रातील विख्यात प्रशिक्षक आणि ‘बॉर्न टू विन’चे संस्थापक व संचालक अतुल राजोळी यांनी अत्यंत सहजसोप्या, हलक्याफुलक्या व मैत्रीपूर्ण शैलीत यशोप्राप्तीचे ५० कानमंत्र या पुस्तकात दिले आहेत. या पुस्तकातलं कोणतंही पान उघडून वाचायला घेतल्यास त्यातून सकारात्मक विचार मिळतो. त्यामुळे हे कानमंत्र आपल्या आयुष्यात प्रभावी बदल घडवण्यासाठी, आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक स्वप्नं साध्य करण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील.यशोप्राप्तीच्या मार्गात प्रत्येक क्षणी साथ व प्रेरणा देणारा आणि तुमच्या सुप्त महत्त्वाकांक्षांना प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्युक्त करणारा –माझा मोटिव्हेटर मित्र!
अप्रतिम पुस्तक! या पुस्तकातलं कोणतंही पान कधीही उघडून वाचावं, त्यातून तुम्हाला नक्कीच लाभदायक विचार मिळेल.– मधुकर तळवलकर, चेअरमन, तळवलकर्स बेटर व्हॅल्यू लिमिटेड
या पुस्तकामुळे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी नेमकं काय करायचं याचं उत्तम मार्गदर्शन मिळेल.– रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक – पितांबरी
ज्या वेळेला तुम्ही संकटात सापडाल, आपण हरलो, थकलो, संपलो असं वाटेल, त्या वेळी हे पुस्तक वाचा. तुम्हाला खात्रीने सकारात्मक मार्ग सापडेल!– डॉ. उदय निरगुडकर, मुख्य संपादक – झी २
Click here to be notified by email when this product becomes available.
Added to cart successfully!