Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Sun Mere Bandhu Re By Satya Sen, Milind Champanerkar
Rs. 0.00
हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातील अग्रणी संगीतकार सचिन देव बर्मन यांना चित्रपटमाध्यमाची चांगली जाण होती;
गानदृश्य व्हिज्युअलाइज करण्याची आणि प्रसंगानुरूप गाणी स्वरबद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात होती.
त्यांच्या अशा वैशिष्ट्यांमुळेच ते इतर समकालीन संगीतकारांपेक्षा खचितच अधिक चतुरस्र व सदाबहार संगीतकार ठरू शकले.
अशा त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांचा शोधक नजरेने मागोवा घेणा‌र्‍या सत्या सरन लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी
केलेला हा अनुवाद– `सुन मेरे बंधु रे'.
`ये रात ये चाँदनी तू कहाँ', `जलते है जिसके लिए', `गाता रहे मेरा दिल' ते `कोरा कागज था ये मन मेरा' यांसारखी
असंख्य आनंददायी प्रणयगीतं... `वक्त ने किया क्या हंसी सितम', `जाये तो जाये कहाँ' यांसारखी अविस्मरणीय विरहगीतं...
`ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है' सारखी सामाजिक रोष व्यक्त करणारी गीतं ते `वहाँ कौन है तेरा', `सुन मेरे बंधु रे' सारखी 
त्यांनी स्वत: गायलेली या मातीतली व तत्त्वज्ञानात्म डूब असलेली गाणी...
त्यांच्या संगीतातील वैविध्याची साक्ष देणारी अगणित गीतं आहेत, परंतु अशा त्यांच्या गीतांची निर्मितीप्रक्रिया उलगडून दर्शवणारं आणि त्यामागच्या प्रेरणास्रोतांचा कल्पकतेने वेध घेणारं हे एकमेवच पुस्तक ठरावं.एस.डी.बर्मन यांच्या संगीताचा व त्यांच्या बालपणापासूनच्या व्यक्तिजीवनातील प्रेरणास्रोतांचा अन्वय लावणारं, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं सांगणारं मराठी संगीत-रसिकांसाठी एक संग्राह्य असं पुस्तक        `सुन मेरे बंधु रे...'

Click here to be notified by email when this product becomes available.

Translation missing: en.general.search.loading